Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना लस तिसरी लाट येण्याआधी सर्वांना लस द्या ; अखिल भारतीय छावा संघटनेची खा. लोखंडेकडे मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर  :- अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सदाशिव लोखंडे याच्या कडे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सर्वांचे लसीकरण व्हावे, तसेच कोरोना रोगाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांना व व्यावसायिका चे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील व ग्रामीण भागातील बाजार पेठा बंद राहिल्यामुळे आर्थिक चक्र बंद झाली आहे पुन्हा तिसरी लाट सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुस्किल करेल, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असतांना नागरिकांना लस उपलब्ध होत नाहीत तरी लसीकरण जास्त प्रमाणत वाढ होण्यासाठी आपण या विषयावर लोकप्रतिनिधी तसेच खासदार या नात्याने लक्ष देऊन मोठा साठा जिल्हात उपलब्ध होईल या कडे लक्ष देऊन जिल्ह्याचे संपूर्ण लसीकरण होईल या कडे लक्ष द्याल अशी विनंती अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली .
यावेळी राज्य कार्यकारणीचे सदस्य   अशोक चव्हाण पा. आ.भा. छावाचे नितीन पटारे जिल्हा सचिव दक्षिण श्री गणेश गायकवाड  कार्याध्यक्ष देवेंद्र लाबे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर शिकारे सल्लागार तसेच कामगार नेते रावसाहेब काळे विद्यार्थी आ. चे प्रमुख सचिन खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष अतुल झुबड नगर तालुकाध्यक्ष किरण फटांगरे, दिपक चांदणे, दत्ता वामन, गोरख आढाव, बहिरनाथ गोरे, अमोल वाळूज ,गणेश शिंदे ,उमेश नवघरे ,रवी जाधव ,विशाल जाधव अनुभव भोसले, सिद्धेश घनवट, नारायण काळे ,जलींदर कापसे,प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी किशोर शिकारे यांनी आभार मानले .




Post a Comment

0 Comments