Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारा अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पळविणारा चोरटा मोठ्या शिताफीने पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. योगेश दुर्गेश साठे असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख  यांच्या सूचनेनुसार पोसई सचिन रनशेवरे, पोहेकाँ गोविंद गोल्हार, पोहेकाँ जी. वाय. जठार, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, चापोकाँ अरूण मोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या  सुमारास राममंदीरजवळ, भिंगार येथे योगेश उर्फ सोनू दुर्गेश साठे (रा. डेअरी फार्म, सैनिक नगर, भिंगार ता. जि. अहमदनगर) याने झोपडीमध्ये झोपलेल्या महिलेच्या पायांना हात लावल्याने  महिला जागी झाली. यावेळी  तिच्या गळ्यातील 5 हजार  रू कि चे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले.  याबाबत दाखल फिर्यादीवरून  भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 307/2021 भादवि कलम 392 प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला.
सपोनि देशमुख यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली, मंगळसूत्र चोर   हा बेलेश्वर मंदीर परिसरात आलेला आहे. त्यानुसार सपोनी श्री. देशमुख यांच्या सूचनेनुसार अहमदनगरला पोलिस पथकाने त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
दरम्यान फिर्यादी महिलेने चोरट्यास ओळखले. यानेच माझ्या गळायतील डोरले चोरलेले आहे,  असे सांगितल्याने योगेश साठे यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याला पोलिसांनी न्यायालायासमोर उभे केले असता, आरोपी साठे याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
 आरोपी साठे याला पोलिस खाक्या दाखविताच दुचाकी ही गोळेगाव (ता. शिरूर जि.पुणे) येथून चोरलेली आहे. दुचाकीच्या टुल बॉक्स मध्ये मी चोरलेले डोरले माजे पाकीटमध्ये ठेवलेले आहे. असे सांगत असल्याने दोन पंचासमक्ष व आरोपीस घेऊन  बेलेश्वर मंदीर परिसरात दर्गाशेजारी जावून भिंगार पोलिसांनी ताब्यात घेऊन ते गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या चोरट्यावर यापूर्वीही भिंगार कॅम्प, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.




Post a Comment

0 Comments