Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जबरी चोरी करणारे आरोपी अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जबरी चोरी करणारे चोरटे पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. साहील राजु काकडे (वय 19  रा. सदरबाजार, भिंगार ता. जि. अहमदनगर ), अविनाश बाप्या अशोक शेलार ( वय 20, रा.भिमनगर, भिंगार ता.जि.अहमदनगर), कृष्णा उर्फ अतुल रमेश नन्नवरे (वय 18  रा. लक्ष्मीनगर, नगर पाथर्डी रोड, भिंगार ता.जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. 
नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी  शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम.के.बैंडकोळी,  पोसई सचिन रनशेवरे, पोहेकाँ ए एन नगरे, पोहेकाँ जी डी गोल्हार, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, पोकाँ रमेश दरेकर, चापोकाँ काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं.309/2021 भादवि कलम 454,457,380 मधील आरोपी  साहील राजु काकडे याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करीत असताना व त्यास विश्वासात घेतले.  दि.8 ऑगस्ट 2021 रोजी माळीवाडा बसस्टॅण्ड परिसरात  साहील राजु काकडे, अविनाश बाप्या अशोक शेलार, कृष्णा उर्फ अतुल रमेश नन्नवरे यांनी मिळून मोपेड गाडी (एमएच 16 बी एल 8147)  वरून एका इसमाकडून रोख रक्कम 2 हजार 500 रोख व एक मोबाईल बळजबरीने घेऊन गेले होते, अशी माहीती समजल्याने भिंगार कॅम्प पोलिसांना त्यांना ताब्यात घेणे कामी आदेश दिल्याने  पोलिसांनी   अविनाश बाप्या अशोक शेलार, कृष्णा उर्फ अतुल रमेश नन्नवरे  यांना ताब्यात घेतले.  त्यांचेकडे विचारपुस करता तिघांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली.
 सदर बाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गु र नं 590/2021 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतांकडून एक मोपेड डीओ गाडी ( एम एच 16 बी एल 8147), एक विवो कंपनीचा मोबाईल ताब्यात घेऊन आरोपींना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई कोतवाली पोलिस हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments