Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीतील दोघे अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिन्याकरीता हद्दपार

  


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
राहाता - तालुक्यातील शिर्डी येथील दोघांवर अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे. कारवाई मध्ये नितीन आण्णा धिवर ( वय ३२), सचिन सिताराम गायकवाड (वय ३२, दोघे  रा. भिमनगर शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) अशी नावे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संघटीतपणे टोळीतयार करुन संघटीतपणे गैरकायदा मंडळी जमवणे, अनाधिकाराणे घरात प्रवेश करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, घातक शस्त्र चाकु, तलवार जवळ बाळगुन दुखापत करणे, किरकोळ कारणावरून गंभिर दुखापत करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे,  जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग करणे असे गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे तसेच मालाविरुध्दचे गुन्हे करणारी गंभीर गुन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments