Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गृहमंत्रालयास सादर केलेल्या अहवालात 'त्यांना ' बदल्या करणारे दलाल म्हटले !

 
👉दुसरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची बदली यादी ही 'नगर रिपोर्टर' च्या हाती
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- तत्कालीन गुप्तचर विभाग अप्पर पोलीस महासंचालक यांनी गृहमंत्रालयास सादर केलेल्या अहवालात 'महादेव इंगळे' हे  बदल्या करणारे दलाल म्हटले, तर इंगळे यांनी बदल्याबाबतची दुसरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची बदली यादी ही 'नगर रिपोर्टर' च्या हाती आली आहे.
  पोलीस अधिका-यांच्या बदल्याचे कारनामा करणारा दलाल म्हटलेला  महादेव इंगळे हे तसे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शेड या गावातील रहिवासी आहे. ते गेल्या २० वर्षापासून मुंबईतच राहत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या यादीतील 18 अधिका-यांच्या बदल्याच्या नावानंतर 'महादेव इंगळे' यांनी बदल्या करण्या संदर्भातील दुसरी खळबळजनक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची बदली यादीसमोर आली आहे. तत्कालीन गुप्तचर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्रालयास सादर केलेल्या अहवालात 'महादेव इंगळे' यांचा बदल्या करणारा दलाल म्हणून म्हटले. या 'महादेव इंगळे' यांनी बदल्या करण्याबाबतची दुसरी यादीच आता 'नगर रिपोर्टर' ला मिळाली आहे.  यामध्ये  आणखीन चार अप्पर पोलीस महासंचालक आणि दोन पोलीस अधीक्षकसह 9 पोलीस उपाधीक्षक उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधीक्षकांचा समावेश आहे .
यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, विनय कुमार चौबे, संजय वर्मा ,नितीन कुमार सिंग यांच्यासह अहमदनगरचे जिल्हा पोलिस मनोज पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मनोज खांडवी या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक गणेश बिराजदार, गणेश केंद्रे, विवेक पवार, विकास तोडावाळ,  पंकज शिरसाठ, अशोक विरकर, धुळा तोपे, हेमंत सावंत आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत.
यापूर्वीच्या 18 नावांमध्ये जी श्रीधर, दिलीप भुजबळ, निसार तांबोळी, विजयकुमार मगर, शिवाजी राठोड, राकेश कलासागर, दिगंबर प्रधान, अतुल झेंडे ,संदीप पालवे ,वैशाली कडूकर, पराग मणेरे, मिलिंद मोहिते, अशोक दुबे, राहुल दस, राहुल खाडे, भरत तांगडे, राहुल श्रीरामे या वरिष्ठ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिका-यांचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी सीबीआयला यापूर्वीच दिला आहे. यामुळेच राज्यातील  पोलीस अधिका-यांच्या बदल्या प्रकरणात झालेल्या तक्रारीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वच पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.


Post a Comment

0 Comments