Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्र. प्राचार्य व लिपीक महिलेस पैसे घेताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले

 

👉बीएचएमएस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पूर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेटसाठी पैसे घेताना 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- बीएचएमएस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पूर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता पैसा स्वीकरताना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य व लिपीक महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. प्रभारी प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, लिपीक भारती बापुसाहेब इथापे असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. श्याम पवरे, पो.नि. दिपक करांडे,  पोकाॅ संतोष शिंदे, पोना.रमेश चौधरी, पोकाॅ रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, मपोकाॅ संध्या म्हस्के, चापोकाॅ  हारुन शेख, पोना राहुल डोळसे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेले माहिती अशी, मुलीचे बीएचएमएस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पूर्ण केल्याबाबतचे सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य बापुसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचेकडे  १ लाख ४७ हजार ५०० ची मागणी केली. तक्रारदार यांनी ला प्र विभागाकडे दि १० ऑगस्ट  २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (दि.12) केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी प्रभारी प्राचार्य बापुसाहेब हरिश्चंद्रे  यांनी तक्रारदार व त्यांची मुलगी यांचेकडे बी.एच.एम.एस पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरशिप पूर्ण केलेल्या कालावधीच्या हजेरीची ॲडजस्टमेंट करुन सर्टिफिकेट देणे करिता होमिओपॅथी मेडीकल कॉलेज वडाळा महादेव येथे पंचासमक्ष  १ लाख ४७ हजार ५०० ची मागणी केली. त्यानंतर आयोजित सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम आरोपी प्रभारी प्राचार्य बापुसाहेब हरिश्चंद्रे  यांचे सांगणे वरुन आरोपी लिपीक भारती बापुसाहेब इथापे यांनी पंचासमक्ष स्विकारली. या दरम्यान दोन्ही आरोपींना  रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments