Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संगमनेर तालुक्यातील तीनजण हद्दपार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

संगमनेरतालुक्यातील कौठे धांदरफळ बु येथील तिघांवर अहमदनगर जिल्ह्यातून १५ महिनेकरीता केले हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश पारित केले आहेत. शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे, अजय रावसाहेब निळे व  विशाल पोपट निळे याच्यावर ही कारवाई केली आहे.


जिल्ह्यातील संघटीतपणे टोळीतयार करुन संघटीतपणे अवैध गौण खनिज बाळ चोरी करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, गैरकायदा मंडळी जमवुन दुखापत करणे, शिवीगाळ करणे असे गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे तसेच मालाविरुध्दचे गुन्हे करणारी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन परिसरातील हद्दपार टोळीतील टोळीप्रमुख शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे ( वय ३८, रा. धांदरफळ बु ता. संगमनेर जि. अहमदनगर) व टोळीतील इतर २ सदस्यांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी अहमदनगर जिल्ह्यातून १५ महिनेकरीता केले हद्दपार केलं आहे.
दि. ४ जुलै २०२० रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी संगमनेर तालुका ठाणे  हद्दीत तसेच अहमदनगर जिल्हा परिसरातील संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द हद्दपारीचा कारवाई व्हावी, याकरीता संगमनेर तालुका पोलीस ठाणे  हद्दपार टोळीप्रस्ताव क्रं ०३/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करुन प्रस्तावामधील ३ इसमाविरुध्द अहमदनगर जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
या प्रस्तावावर हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी हद्दपार टोळीविरुध्द संगमनेर तालुका हद्दीतील तसेच अहमदनगर जिल्हा परिसरात संघटीतपणे टोळीतयार करून संघटीतपणे संघटीतपणे अवैध गौण खनिज वाळू चोरी करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, गैरकायदा मंडळी जमवुन दुखापत करणे, शिवीगाळ करणे असे असे गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे तसेच मालाविरुध्दचे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर संघटीतपणे गुन्हे कारणारी टोळीतील टोळीप्रमुख  शिवप्रसाद भाऊसाहेब वाकचौरे (वय ३८ वर्षे, रा. धांदरफळ व ता. संगमनेर जि. अहमदनगर), टोळीसदस्य अजय रावसाहेब निळे (वय २३, रा. कौठे धांदरफळ, ता.संगमनेर, जि. अहमदनगर) व  विशाल पोपट निळे (वय २०, रा. कोठे धांदरफळ, ता.संगमनेर, जि. अहमदनगर) यांची संगमनेर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तसेच अहमदनगर जिल्हा परिसरात सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच सदर टोळीची सर्वसामान्य नागरीकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी तसेच टोळीच्या गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर टोळीचे टोळीप्रमुख व टोळीतील नमुद २ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे
कलम ५५ नुसार कारवाई करुन १५ महिनेकरीता संपूर्ण अहमदनगर जिल्हा हद्दीतून दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी हद्दपारीचा अंतिम कारवाई करुन हद्दपारीचा आदेश पारित केला आहे.
सदर टोळीतील टोळीप्रमुख व टोळीतील इतर सदस्यांविरुध्द संगमनेर तालुका, अकोले ठाण्यात
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर हद्दपार इसमाविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली होती. वरील प्रमाणे संघटीतपणे गुन्हे करणारी टोळीविरुध्द माहिती संकलीत करुन विविध गुन्हेगारी टोळीविरुध्द हद्दपार सारखी प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षक  मनोज पाटील यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments