Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

९ ठिकाणी छापे : ५ लाखाचा मुद्देमाल जप्त; एलसीबीची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ९ ठिकाणी छापे टाकून ५ लाख ४ हजार ६४० रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. १२ आरोपीविरुध्द शेवगाव, श्रीरामपूर तालूका, भिंगार कॅम्प, राहुरी, कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल  व श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. नगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम राबवून दि. ३१ जुलै २०२१ ते दि. ०२ ऑगस्ट २०२१ चे दरम्यान ९ ठिकाणी छापे टाकून एकूण ५ लाख ४ हजार ४६० रु. किं. चा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, देशी दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने, नवसागर व इलेक्ट्रिक भाता जप्त केला. 


Post a Comment

0 Comments