Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बालसंगोपन निधीसाठी अजित पवार साथ देत नाहीत; यशोमती ठाकूर यांची थोरातांकडे तक्रार

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा आरोप महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अकोल्या जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
“बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. साडे चारशे रुपये त्यांना मिळत होते. आपण काही काळापूर्वी १ हजार १२५ रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी २ हजार ५०० रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. पण उपमुख्यमंत्री आम्हा पाहिजे तेवढी साथ देत नाही आहेत. तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल,” असं यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.

यशोमती ठाकूर यांनी  बाळापुर रोडवरील हॉटेल मराठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केलेली मदत सुपुर्द केली तसेच यावेळी शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी, भूसंपादन मोबदला आणि इतर काही प्रश्न जाणून घेतले, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments