Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात तारेला चिकटून एकाच मृत्यू

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पाथर्डी : उसाच्या शेतात डुकरासाठी लावलेल्या तारेला चिकटुन खड्या रामु चव्हाण ( रा, साकेगाव) यांचा मृत्यु झाला. २२ ऑगस्टला रात्री घटना घडली. दोन दिवसानंतर घटना उघडकीस आली व पोलिसात गोपाळ रायभान भोसले (रा. साकेगाव) याच्या तक्रारीवरुन मृत्यू कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला आहे.


 नवनाथ गर्जे (रा. पाडळी) यांचे पाडळी शिवारात उसाचे शेत आहे. तेथे रानडुकरे उसाचे नुकसान करतात म्हणून त्यांनी शेताच्या बांधाव तार लावली होती. त्यामधे विजेचा करंट सोडलेला होता.  २२ आँगस्ट २०२१  रोजी  खड्या चव्हाण शिकारीला शेतामधे गेला होता. तेथे गेला त्याचा पाय तारेचा चिकटला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. दोन्ही पायाला तारेला चिकटल्याच्या खुणा होत्या. खुड्याचा मोहुणा गोपाळ भोसलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. पंचनामा केला आहे. रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत. पाडळी शिवारातील या घटनेमुळे चव्हाण मयत झाला आहे. व शेतकरी नवनाथ गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

Post a Comment

0 Comments