Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेचे मंगळसूत्र चोरणारा २४ तासात जेरबंद ; कोतवाली पोलीसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर-  महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूञ व रक्कम काढून घेणा-या चोरट्यांस २४ तासाच्या आत पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
 जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पो.नि. राकेश मानगांकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार डिबीचे पोसई मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पांना नितीन गाडगे, पोना शाहीद शेख, पोना बंडु भागवत, पोना भारत इंगळे, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ तान्हाजी पवार, पोकॉ सुमित गवळी, पोकाॅ कैलास शिरसाठ, पोकाॅ प्रमोद लहारे, पोकाॅ  सोमनाथ राऊत, पोकों सुशील वाघेला आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
सोमवारी ( दि.२) दुपारी १२  वाजण्याच्या  सुमारास बहिण कलाबाई असे राहुरी या ठिकाणी नाकाचे हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी जाण्यासाठी माळीवाडा बसस्टॅन्डमध्ये राहुरी येथे जाणारी बस पाहण्यासाठी जात होत्या. एक अनोळखी इसमाने ओळख नसतांना मी तुम्हाला ओळख आहे, तसेच मी चाकुंज गावचा तलाठी आहे, असे म्हणून तुमचे बँकेचे पिकविम्याचे ७० हजार रुपये आलेले आहेत. असे म्हणून  रिक्षामध्ये बळजबरीने बसवून पुणे स्टॅन्डचे पाठीमागे रिक्षामध्ये नेले.   २ हजार रु रोख रक्कम घेऊन त्यानंतर तिच्या गळ्यातील ६४ मनी असलेली सोन्याची पोत ३५ हजार  रु किंमतीची बळजबरीने चोरुन नेले, या शांताबाई सोपान मोरे (वय ६५, रा- चाकुंज बायपास वाकुंज ता नगर जि अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments