Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महामार्गावर वाहन चालकांना लुटमार करणारी टोळी पकडली ; एलसीबीची धडकेबाज कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-  जिल्ह्यातील नगर-मनमाड, नगर-पुणे, लोणी-संगमनेर या महामार्गावर वाहन चालकांना अडवून हत्याराचा धाक दाखवून लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडून 1 लाख 95 हजार 500 रु. किं. चे मुद्देमाला जप्त केला. या टोळीकडून रस्तालुटीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून, ही महत्त्वाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सपोनि गणेश इंगळे, सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना शंकर लोढे, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे. पोकॉ जालिंदर माने, आकाश काळे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित येमूल, सागर सुलाने पोकॉ माच्छिद्र बर्डे चालक पोहेकॉ उमाकांत गावडे, बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समलेली माहिती अशी की, दि. 4 ऑगस्ट 2021 रोजीचे रात्रीचे वेळी  मोटार सायकलवरून खंडाळा, श्रीरामपूर येथून समनर आखाडा येथे नगर मनमाड रोडने त्यांचे घरी येत असताना रात्री 7.45 वा. चे सुमारास शनिशिंगणापूर फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले असता सोनई रस्त्याने काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी चार इसमांनी फिर्यादीस कत्तीचा धाक दाखवून फिर्यादी जवळील रोख रक्कम मोबाईल बैग व मोटारसायकलस एकूण 20 हजार रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता, या दिलीप देवराम तमनर (वय 35 , रा. तमगर आखाडा, राहुरी, ता. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुरनं. 652/2021 भादवि कलम 392, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापूर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने जिल्हा  पोलीस अधीक्षक श्री पाटील  यांचे सुचनानुसार  , स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके  यानी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार  स्थानिक गुन्हें शाखेचे पथक हे समांतर तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.   गुन्हा हा गणेश माळी ( रा. वरवडी, ता. राहूरी) व नितीन माळी (स. मोरे चिंचोरे, ता. राहुरी) यांनी व त्यांचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. यानुसार कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने राहुरी येथे जावून आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन व आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी नितीन मच्छिन्द्र माळी,  गणेश रोहीदास माळी ( वय- 21 व रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता राहूरी यांना वरवडी, ता. राहुरी) येथून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली.  त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांनी व त्याचे इतर सात साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी  रवि पोपट लोढे ( वय- 22 वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा),  निलेश संजय शिंदे (वय 21, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर) व  एक अल्पवयीन साथीदार असे तीन साथीदारांना राहुरी व घोडेगाव परिसरातून ताब्यात घेतले. तसेच उर्वरित चार साथीदारांचा शोध घेतला. परंतु पोलिस पथकाला ते मिळून आले नाही.

Post a Comment

0 Comments