Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात ८ ठिकाणी छापे टाकून १० लाखाचा तंबाखूजन्य मावा,गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, मावा विक्रेत्याविरुध्द अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे.   १० लाख ९ हजार ८७०  रु. किं. चा मुद्देमाल जप्त केला असून,११ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  ही कारवाई नगर शहरात कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, शेवगाव तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी 
अपर पोलिस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके व त्यांचे पथकाने महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या गुटखा, पानमसाला व मावा विक्रेत्या विरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये कारवाईची विशेष मोहीम राबवून दि.२१ ते दि. २६ ऑगस्ट २०२१ चे दरम्यान ८ ठिकाणी छापे टाकून  १० लाख ९ हजार ८७० रु. किं. चा मुद्देमाल त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, कच्ची सुपारी, तयार मावा, चूना, मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशिन जप्त करण्यात आले आहे. या दरम्यान ११ आरोपी विरुध्द कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी व शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय संहिता १८६० चे कलम ३२८, १८८, २७२, २७३ नुसार  प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments