Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अरणगाव ते सोनेवाडी रस्त्यावर खून

 

👉मयताची ओळख पटल्यास नगर तालुका पोलिसांना माहिती द्यावी : सपोनि राजेंद्र सानप
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर अज्ञात व्यक्तीने टणक व कठीण हत्याराने पाठीवर, डोक्यावर व हातापायावर गंभीरपणे मारल्याने ती अज्ञात व्यक्ती मयत झाल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव ते सोनेवाडी जाणारे  बाजुस घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.9 वाजेचे पूर्वी अरणगाव ते सोनेवाडी जाणारे रेल्वे ओव्हरब्रीजचे रोडचे बाजूस खाली उताराला वनदास पांडुरंग पुंड यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली अज्ञात आरोपींनी अज्ञात व्यक्तीस टणक व कठीण हत्याराने पाठीवर डोक्यावर पाठीवर हातापायावर गंभीरपणे मारल्याने त्याच्या  फुफ्फुसाला अंतर्गत जखमा झाल्याने त्या अज्ञात व्यक्तीची मयत झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्दात जिवे ठार मारल्या (खूनाचा) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत.
👉या खून झालेल्या अज्ञात व्यक्ती ही ओळखीची असल्यास नगर तालुका पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments