Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पोनि राकेश मानगांवकर यांच्यासह दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांना स्थगिती

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  - कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह शहर विभागाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांना स्थगिती मिळाली असून ते आता त्यांच्या मूळ पदावर काम करणार आहेत. दरम्यान, अन्य दोन अधिकार्‍यांच्या नगर जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत.
पोलीस निरीक्षकांच्या वरिष्ठ पातळीवरून बदल्या नुकत्याच झालेल्या होत्या. त्या बदल्यांना स्थगिती मिळण्यासाठी तिघांनी प्रयत्न केले होते. यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, शहर विभागाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांचा समावेश असून त्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, नाशिक परिक्षेत्र विभागातून पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांची नगर येथे बदली करण्यात आली आहे. तर नगर जिल्ह्याबाहेर पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व विकास देवरे यांची बदली झाली आहे.

Post a Comment

0 Comments