Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

घरफोडीच्या तयारीतील चोरटे अटक ; कर्जत पोलिसांची कामगिरी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत-  रात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना घरफोडीच्या तयारीतील असणारे चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. मुर्गेश गोविंद नायर (वय 40, रा. नागपूर चाळ, पहिली गल्ली मज्जित जवळ येरवडा पुणे), मोसिन बिलाल सय्यद (वय 32, रा. येरवडा पुणे) असे व 2 अल्पवयीन मुले पकडण्यात आले आहेत.
कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी  आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे  पो. नि. चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सुरेश माने, पोउपनि अमरजित मोरे, किरण साळुंके पोकाॅ पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे, गोवर्धन कदम आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, रात्रीच्या वेळी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी करणारे आरोपी पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तीन पथके तयार करुन सतर्कपणे कोम्बिंग ऑपरेशन कर्जत मध्ये सुरु आहे. त्यानुसार कर्जत परिसरतून एक पथक शिंदेवाडी रोडने माहीजळगावकडे जात असताना हॉटेल समृद्धीजवळ रोडवर एक पांढरे रंगाची युवान गाडी (क्र. एमएच 12 क्यू.एफ 88 43) असलेली उभी दिसली. तिच्यामध्ये चार इसम  संशयितरित्या बसलेले दिसले. सदर गाडीचा व इसमंचा पोलीस पथकातील अधिकारी कर्मचारी यांना संशय आल्याने, त्यांची नावे विचारली असता मुर्गेश गोविंद नायर  (रा. नागपूर चाळ, पहिली गल्ली मज्जित जवळ येरवडा पुणे), मोसिन बिलाल सय्यद ( रा. येरवडा पुणे ) असे व 2 अल्पवयीन मुले मिळुन आल्याने त्यांची गाडीची पांचासमक्ष झडती घेतली. त्यांचे गाडीमध्ये घरफोडी करण्यासाठी एक लोखंडी कटावणी, लोखंडी कुकरी, एक मूठ आणि कव्हर असलेला चाकू असे वर्णनाचे घरफोडी चोरी,जबरी चोरी,करण्याचे साहित्य मिळून आले. त्यांचेविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात भादवि कलम 401,34 आर्म एक्ट 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना  चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन आरोपींना  बालकास बालसुधारगृह (श्रीरामपूर ) येथे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सलीम शेख हे करत आहेत.


Post a Comment

0 Comments