Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर शहरात दुचाकी चोरणारी सराईत टोळी जेरबंद, ६ दुचाकी जप्त ; एलसीबीची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर-  नगर शहरातून दुचाकीवर चोरणा-या सराईत चौघांची टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या चोरट्यांकडून २ लाख ९५ हजार रुपयांच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.
दिलीप दत्तात्रय शिंदे (वय २६, रा. गोंधळे मळा, नागरदेवळे, ता. नगर), प्रफुल्ल गजानन गांगेकर, (वय ३०, रा. गोंधळे मळा, नागरदेवळा, ता. नगर), खालील बालम शेख ( वय ४५, रा. नागरदेवळा, ता. नगर),  अमजद हुसेन शेख (वय ४५, रा. मोमीनपुरा, भिंगार) यांना ताब्यात घेतले असून, अवतार जहूर अहमद शेख (रा. गवळीवाडा, भिंगार) याचा पोलीस शोध घेत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, पोहेकॉ संदीप पवार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, ज्ञानेश्वर शिंदे, पोकों कमलेश पाथरुट, योगेश सातपुते व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, दि. १६ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी  गणेश सोहनलाल गुलाटी ( रा. इंदीरा कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) हे त्यांचे मालकीची बजाज पल्सर मोटार सायकल ( एमएच-१६ सीपी-२६११) ही त्यांचे घरासमोर पाकींग करुन घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती. सदर मोटार सायकल चोरीबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. ७०० / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच अहमदनगर शहरामध्ये दुचाकी वाहन चोरीच्या घटनामध्ये वाढ झालेली असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आदेशाने पो.नि.श्री.  कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमून दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून तपास करीत असताना पोनि श्री कटके यांना गुप्त खब-याकडून माहिती मिळाली की, गुन्हा हा दिलीप शिंदे (रा. नागरदेवळे, ता. नगर) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.  एलसीबी पथकाने नागरदेवळे येथे जावून मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेऊन आरोपीचा शोध घेवून आरोपी  दिलीप दत्तात्रय शिंदे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हा हा त्याचा साथीदार प्रफुल्ल गांगेकर असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. आरोपीचा शोध घेऊन आरोपी प्रफुल्ल गजानन गांगेकर यास ताब्यात घेतले.  दोन्ही आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेली ९० हजार  रु. किं. ची काळे रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली.
दरम्यान आरोपींना विश्वासात घेऊन अहमदनगर शहरामधून आणखी किती दुचाकी व कोठून चोरलेल्या आहेत याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी अहमदनगर शहरातून रेल्वे स्टेश पाकींग, गुलमोहोर रोड, नेता सुभाष चौक, गोविंदपुरा व सिव्हील हॉस्पिटल येथून दुचाकी चोरलेल्या असून त्यापैकी तीन दुचाकी या भिंगार व नागदेवळा येथे विकल्या असून दोन दुचाकी आमच्याकडे असल्याचे सांगितले. माहितीचे आधारे आरोपी  खालील बालम शेख, अमजद हुसेन शेख यांना ताब्यात घेतले. तसेच आरोपी अवतार जहूर अहमद शेख, (रा. गवळीवाडा, भिंगार) याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.


Post a Comment

0 Comments