Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ट्रक चोरीची खोटी फिर्याद देवून विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न : ट्रकसह दोघे पकडले ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- ट्रक चोरीची खोटी फिर्याद देवून विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना  ट्रकसह आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. रेहान आयूब शाह (वय २९, रा. बाबरपूरा चौक, पाण्याचे टाकीजवळ, वार्ड नं. २, श्रीरामपूर ), इफ्लेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख (रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर ) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे असून एक फरार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यामार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, सफौ नानेकर, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रविन्द्र घुंगासे, सागर ससाणे, रोहीत येमूल, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी रेहान आयुब शाह यांनी त्यांचे मालकीचा अशोक लेलँड कंपनीचा, दहा टायरचा ट्रक ( एमएम-१७ -बीवाय-५५५९) हा ६ लाख  रु. किं. चा ट्रक सम्राटनगर, सुतगिरणी, श्रीरामपूर येथील स्टील कंपनीमधून दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी सांयकाळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले बाबत फिर्यादी दिली होती. या फिर्यादीवरून  वरुन गुरनं. ५४० / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच यापुर्वीही श्रीरामपूर शहर परिसरामध्ये ट्रक चोरीचे गुन्हे घडलेले असल्यामुळे जिल्हा  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि कटके यांना गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. फिर्यादी व त्याचे साथीदारांनी विमा कंपनीकडून विम्याचे पैसे वसूल करण्याचे उद्देशाने सदरचा गुन्हा केलेला आहे,  अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने  श्रीरामपूर येथे जावून प्रथम गुन्ह्यातील आरोपी (गुन्ह्यातील फिर्यादी)  रेहान आयूब शाह यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार ईत्तू शेख व पप्पू गोरे अशांनी मिळून ट्रकचे विम्याचे पैसे विमा कंपनीकडून वसूल करण्यासाठी ट्रक चोरीस गेल्याचा बनाव करुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली असल्याचे सांगितले. त्यावरुन आरोपींचा शोध घेऊन आरोपी  इफ्लेकार उर्फ इत्तू इस्माईल शेख यांस ताब्यात घेतले. त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला ६ लाख  रु. किं. चा अशोक लेलैंड कंपणीचा, दहा टायरचा ट्रक (एमएम-१७ चीवाय ५५५९) हा जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. आरोपी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे ( रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर) याचा शोध घेतला, परंतू तो मिळून आला नाही. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत

Post a Comment

0 Comments