Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संत वामनभाऊ विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 पाथर्डी- तालुक्यातील  चिंचपुर पांगुळ येथील संत वामनभाऊ विद्यालयामध्ये इ.दहावी च्या विशेष गुण संपादन केलेल्या विद्यार्थी आणि पालकांचा कौतुक सोहळा सोमवारी कोरोना नियमांचे पालन करत पार पडला. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र चिंचपुर पा. चे शाखाधिकारी नागेश शिरसाठ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी वि. वि. का. सेवा.सो.चे सचिव दगडू बडे, कृष्णा गरड,विद्यालयाचे मुख्या. संजय घिगे सर ,वर्गशिक्षक  मरकड, भालेराव सर, पर्यवेक्षिका गर्जे मॅडम ,तुकाराम बडे, सोनाजी बडे ,काँग्रेस ता.उपाध्यक्ष पोपटराव बडे, पत्रकार सोमराज बडे, विष्णू राजगुरू,बाबासाहेब राजगुरू, तसेच इतर शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता. 
इयत्ता दहावीतील चि.ईश्वर राजगुरू (92.40),  कु.काजल बडे (92.20),कु.प्रगती बडे (90.60),कु.शुभांगी बडे (90.20) या प्रमाणे गुण मिळाले आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी बँक शाखाधिकारी श्री शिरसाठ यांनी कठोर मेहनत आणि परिश्रम, सातत्य एखाद्या गोष्टीचा ध्यास, संघर्ष, व त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ, गुरूजनाचे मार्गदर्शन,शैक्षणिक कर्ज,भविष्यातील संधी याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी श्री घिगे यांनी सांगितले की कोरोना काळात,गृहभेटी,तसेच ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचीआणि घेण्याचीं हि पहिलीच वेळ होती ,परंतु या परिस्थितीत  विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परिश्रम घेतल्याने विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मरकड सर यांनी केले तर आभार श्री घुले सर यांनी मानले.

संकलन -सोमराज बडे पत्रकार मोबा-९३७२२९५७५७

Post a Comment

0 Comments