Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

..अखेर आरोपी सादीक बिराजदार मयत


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  भिंगार कॅम्प पोलीस आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेऊन पोलिस गाडीत घेऊन जात असताना, दरम्यान पोलिस गाडी आडवून आरोपी याला झालेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान त्याची शुक्रवारी (दि.20) राञी मयत झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, भिंगार कॅम्प पोलीस हे 376 दाखल गुन्ह्यात असलेला आरोपी सादीक बिराजदार याला त्याच्या घरून पोलिस गाडीत घेऊन जात होते. या दरम्यान, संबंधितांनी पोलिस गाडी आडवून आरोपी सादीक बिराजदार याला  मारहाण केली होती, त्या मारहाणीत आरोपी सादीक हा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार (दि.15) सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास  भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत घडली होती. यानंतर जखमी सादीक याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.20) राञी आरोपी सादीक हा मयत झाला आहे.
परंतु या गंभीर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी हा पोलिस गाडीतून पळून जात अपघात झाल्याच्या घटनेबाबत पोलिसांनी तर दुसरी  संबंधिताच्या मारहाणीत आरोपी जखमी झाल्याच्या आरोपीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून असे एकाच घटनेबाबत दोन स्वतंत्र गुन्हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु यात आरोपी मयत सादीक बिराजदार याच्या पत्नीने दिलेला जबाब महत्त्वपूर्ण ठरेल!. यामुळे याप्रकरणी  संबंधित पोलिस कर्मचा-यांवर नेमकी कारवाई होती की, नाही, याकडे संपूर्ण राजकीय तसेच पोलिस वर्तुळात लक्ष लागले आहे.
 दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 वाजेचे दरम्यान  पती सादीक बिराजदार यांना आमचूया घरापासून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  घेऊन जात असतांना भिंगार नाल्याजवळ पती सादीक यास रिक्षातून आलेले मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद,  रशीद रसुल सय्यद,  कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा.दर्गादायरा, मुकुंदनगर, अहमदनगर ) यांनी पोलीस गाडीतून खाली उतरवून लोखंडी राॅडने डोक्यात व इतर ठिकाणी मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची मारहाण ही मी रोडवरील लाईटच्या उजेडात पाहिलेली आहे, हा जबाब आरोपीच्या पत्नीचा तपासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे या गंभीर घटनेची अधिक चौकशी झाल्यास अनेक गोष्टीचा तपासात उलगडा होईल.

Post a Comment

0 Comments