Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी अटक; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर - पाथडी महामार्गावर  भिंगार रोडने बाराबाभळी गावचे दिशने दुचाकीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणा-यांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. केशव उर्फ काज्या ताज्या भोसले (वय 20  रा. डेअरी फार्म, चर्चमागे यशवंतनगर, भिगार ता. जि. अहमदनगर),  मयुर उर्फ हरीष युवराज काळे (वय 25 रा. लक्ष्मी मंदीरजवळ, यशवंतनगर, भिंगार ता. जि. अहमदनगर),  वैभव नख-या चव्हाण (वय 25 रा. लक्ष्मीमंदीरजवळ, यशवंत नगर, भिंगार ता. जि. अहमदनगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी पोसई शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एम के बेडकोळी, पोहेकॉ सचिन रनशेवरे,  पोहेकॉ जी डी गोल्हार, पोना जी वाय जठार, पोना राहुल द्वारके, पोना भानुदास खेडकर, पोकाॅ  गणेश साठे, अविनाश कराळे, समीर शेख, महादेव निमसे, भागचंद लगड,संजय काळे, संदिप शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
नगर शहर  पोलीस अधिकारी उपविभागीय श्री ढुमे यांचे सूचना प्रमाणे  भिंगार कॅम्प पोलीस  खाजगी व सरकारी वाहनाने फरार व पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना भिगार कॅम्प पोलीस ठाण्याचे  प्रभारी अधिकारी सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली. त्यानुसार  भिंगार कॅम्प पोलिसांनी  प्रकाश हॉटेल समोर नगर पाथडी रोड, अहमदनगर येथे शेतात सापळा लावून दबा धरून बसले. त्यानंतर काही वेळातच तीन मोटर सायकलवरून 5 इसम डबलसिट बसून विजयनगर चौक कडून बाराबाभळीकडे येताना दिसले. पोलोसांची व पंचांची खात्री झाल्याने सर्वांनी एकमेकांना इशारे करून सर्वांनी एकाच वेळी रस्त्यावर येऊन त्यांना मोटार सायकली थांबविण्याचे इशारे केले. पुढे असलेल्या दोन मोटर सायकली थांबवून सदर मोटर सायकलीवरील 3 इसमांना ताब्यात घेतले.  या सर्वांना ताब्यात घेत असताना त्यांचे पाठीमागून येत असणा-या आणखी एक मोटर सायल वरील दोन इसमांनी पोलीसांना हुलकावनी देऊन ते दोघे पाथर्डी रोडचे दिशेने भरधाव वेगात निघून गेले. सदर मोटर सायकलवरील क्रमांक अस्पष्ठ असल्याने तो दिसून आला नाही. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस स्टाफची व पंचांची ओळख देऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे पत्ते केशव उर्फ काज्या ताज्या भोसले,  मयुर उर्फ हरीष युवराज काळे, वैभव नख-या चव्हाण असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पकडलेल्या इसमांकडे पळून गेलेल्या इसमांबाबत चौकशी केली असता केशव ताज्या भोसले याने पळून गेलेल्या इसमांची नावे ताज्या पाच्या भोसले (रा सैनिक नगर, भिंगार),  रुपेश ताज्या भोसले (रा. सैनिक नगर, भिगार) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पकडलेल्या इसमांची अंगडझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये एक सत्तू दोन लाकडी दांडके, दोरी,मिरची पावडर, व दोन मोटर सायकल असा दरोड्याच्या तयारीतील मुद्देमाल एकूण 60 हजार 30 रू रकमेचा मुद्देमाल मिळून आला. पोना  राहुल द्वारके यांच्या फिर्यादीवरून 
 भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात  गुर नं 301/2021 भादवि कलम 399,402, आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
मयुर उर्फ हरीष युवराज काळे या आरोपीवर भिगार कॅम्प, तोफखाना, नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Post a Comment

0 Comments