Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तलवार बाळगणारे दोघे अटक ; कर्जत पोलिसांची कामगिरी

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- गुन्हे करण्यासाठी तलवार बाळगणा-या दोघांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कर्जत पोलिसांनी केली. भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड, निखिल राजेद्र पवार (दोघे रा. मिरजगांव, ता. कर्जत ) असे ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.
कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी   आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार  पोउपनि अमरजित मोरे, प्रबोध हंचे, रवी वाघ जितेंद्र सरोदे, बबन दहिफळे, सुभाष पंडागळे, गणेश काळणे, महादेव कोहक  आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलीस ठाण्यात घरफोडी गु .र . नंबर 499 / 21 भा .द.वि .कलम 457 380 461 या टी. व्ही. चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड व निखिल राजेद्र पवार यांचा मिरजगांव बेलगांव गावचे शिवारात पोलिस शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली.  त्याच्या ताब्यात धारदार तलवार बाळगून आहेत. ते गुन्हा करण्याची शक्यता आहे.  सध्या मिरजगाव परिसरात फिरत आहेत. दरम्यान मिरजगांव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ सदरचे दोघेजण इसम त्यांच्याकडे असलेल्या एका मोटार सायकलवरून बेलगांवचे दिशेने जात असलेले दिसले. या दरम्यान त्याना कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिसांनी जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी   भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड यांचे कब्जात एक लोंखडी मुठ असलेली धारदार तलवार मिळून आली. सदर इसमाना ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.  आरोपींवर यापूर्वीचे जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.


Post a Comment

0 Comments