Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जि.प.शाळेचा एलईडी चोरणारे चोरट्यांच्या कर्जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत : तालुक्यातील मिरजगाव जिल्हा परिषद शाळेसाठी असणारा १ लाख रु. किमतीच्या एल.ई.डी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संच चोरणारे तिघा चोरट्यांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे. स्वप्निल गायकवाड (रा.बेलगाव ता.कर्जत), गणेश निंबाळकर ( वय 25), निखील पवार ( वय 24), शुभम उर्फ भूंग्या गायवाड ( वय 24) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत  उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार पोउपनि अमरजित मोरे, पोहेकॉ प्रबोध हांचे, बबन दहिफळे, पोना जितेंद्र सरोदे, रवी वाघ, सुभाष पडगळे,पोकॉ गणेश काळाने, महादेव कोहक आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी,   मिरजगाव (ता.कर्जत) येथील जिल्हा परिषद शाळेतील अंदाजे १ लाख रु. किमतीच्या एल.ई.डी इंटरऍक्टिव्ह पॅनेल संच दि.३ रोजी चोरट्यांनी चोरुन नेला होता. शाळेतील डिजिटल रूमचा दरवाजा तोडून एल.ई.डी.इंटरऍक्टिव्ह संच सर्व किटसह चोरून नेला होता.  संच हा आ.रोहित पवार यांच्या वतीने देण्यात आलेला होता. कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम ४६१,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.कर्जत पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली. सदरचा गुन्हा स्वप्निल गायकवाड याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केलेला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी (दि.१०) स्वप्निल गायकवाड (रा.बेलगाव ता.कर्जत) पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा हा गणेश निंबाळकर , निखील पवार, शुभम उर्फ भूंग्या गायवाड या साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील  आरोपींचा कर्जत पोलिसांनी परिसरात शोध घेऊन चोरीस गेलेल्या मालासह त्यांना पकडण्यात आले.
👉शाळा-महाविद्यालयांनी सतर्क राहावे!
     सध्या अनेक शाळा-महाविद्यालये कोरोनामुळे बंद आहेत याचा फायदा चोरटे घेऊ शकतात.त्यामुळे महागड्या किमती वस्तू सीसीटीव्हीच्या निगरानीखाली ठेवाव्यात.जिथे वस्तू ठेवल्या आहेत तिथे लोखंडी दरवाजे बसवावेत.जर अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी.
               - चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक

Post a Comment

0 Comments