Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरटीजीएस न करता व सोन्याचा तुकडा घेऊन 'नोकर' ने केली फसवणूक ; तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

अहमदनगर : आरटीजीएस करण्यासाठी दिलेले क्रॉस चेक बँकेत जमा न करतात आणि त्याच्याकडे देण्यात आलेला 75 ग्रॅम सोन्याचा तुकडा हा संबंधितास न देता स्वतःकडेच ठेवून फसवणूक केल्याचा गुन्हा नोकरावर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. नोकर नवनाथ अनिल केरूळकर याच्याविरुध्द सराफ संतोष बुराडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 4 ऑगस्टला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नोकर  नवनाथ अनिल केरूळकर (रा. शेंडी पोखर्डी ता.जि. नगर) याच्याकडे विश्वासाने प्रवरा सहकारी बँक, अहमदनगर येथे 30 लाख रुपये रक्कम ही भरली. यानंतर आरटीजीएस ने नोकर  केरूळकर याच्याकडे बँकेचा क्रॉस चेक दिला.  तो चेक हा आरटीजीएस करून पायल गोल्ड, पुणे यांच्या कार्पोशन बँकेत जमा करण्यास नोकर केरूळकर याला सांगितले. तसेच 75 ग्रॅम सोन्याचा तुकडा हा पुणे येथील सोन्या मारुती चौकातील सोन्याचे दागिने तयार करणारा कारागीर यांना देऊन ये, असे नोकर  केरूळकर याला सांगितले.  परंतु पैसे आरटीजीएस न करता व सोन्याचा तुकडा संबंधित कारागीर न देता स्वतःच्या फायद्याकरता वापरून फसवणूक केली आहे, या सराफ संतोष सोपान बुराडे (रा. गुलमोहररोड आनंदशाळा समोर सावेडी अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून नोकर नवनाथ केरूळकर याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम 406, 408 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तोफखान्याचे सपोनि किरण सुरसे हे करीत आहे.

👉सावेडीत महिलेचे धूम स्टाईलने गंठण चोरी अहमदनगर -  घरी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाईलने ओढून  तोडून चोरून नेल्याची घटना सावेडी येथे गुरुवारी घडली. 
 याबाबत समजलेली माहिती अशी की, घरी पायी जात असताना  गुलमोहररोड  जागृती कॉलनी,सावेडी येथील घराच्या गेटजवळ आले असता, दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी गळ्यातील 90 हजार रुपयाचे पावणेतीन तोळे वजनाचे गंठण बळजबरीने ओढून तोडून चोरून नेले, या शोभा झावरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि किरण सुरसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments