Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरीस गेलेला राणीहार लांडगे कुटुंबाला मिळाला परत ; नगर तालुका पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेला राणीहार लांडगे  कुटुंबाला नगर तालुका पोलिसांनी मिळवून दिला. चोरीस गेलेला हार पुन्हा मिळल्याने लांडगे कुटुंबाने विशेषतः सपोनि राजेंद्र सानप यांच्यासह सर्व पोलीस कर्मचा-यांचे मोठे आभार मानले. या नगर तालुका पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीचे नगर तालुक्यातून मोठे कौतुक केले जात आहे.
 याबाबत समजलेले माहिती अशी की, शिवाजी मारुती लांडगे  (रा पिंपळगाव कौडा ता.नगर)  यांचे घरातून घरफोडी करून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा साडेतीन तोळ्याचा  राणीहार चोरट्यांनी चोरून नेला होता. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करून  चोरीस गेलेला राणीहार चोरट्यांकडून मिळवला. याबाबत मंगळवार (दि.8) न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नगर तालुका पोलिसांनी फिर्यादी लांडगे यांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान सपत्नी लांडगे शेतकरी कुटुंबाला  सोन्याचा राणीहार परत घेताना त्यांना आनंदाश्रू आले. लांडगे कुटुंबाने विशेषतः सपोनि राजेंद्र सानप यांच्यासह सर्व पोलीस कर्मचा-यांचे मोठे आभार मानले.

Post a Comment

0 Comments