Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रापंचायतीमध्ये कोबो टूल ; ग्रामपंचायत ऑनलाईन,पाणी आणि लोकसंख्या सह गावातील जनावराचे करता येणार नियोजन


 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक यक्तीला केंद्र सरकारच्या धोणानुसार 55 लिटर प्रमाणे कुटुंबाला शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे  तसेच सांडपाणी व घनकचरा व्य वस्थापन करावे आणि शाश्वत स्वच्छ्ता टिकून रहावी यासाठी कोबो टूल च्या मदतीने जिल्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती ऑनलाइन करण्याची प्रकिया सुरू झाली आहे.    

     
    जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने 22 जुलै ते 7  ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात "गाव विकास कृती आराखडा" निर्मिती  साठी विशेष अभियानाची अंमलबजावणी चालू आहे.या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यामधील जल जीवन मिशन व ग्रामीण पाणपुरवठा विभाग जिल्हा परीषद अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमानाने जिल्यातील सरपंच व ग्रामसेवक, जलसूरक्षक, आशाताई, अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा निर्मिती प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रक्षिशनाला जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव,कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, देखभाल व दुरुस्ती  विभाग चे शाखा अभियंता विनोद देसाई उपस्थित होते. यावेळी सदर  प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांना प्रशिकषणार्थींना जल जीवन मिशन चे मूल्यमापन व सनियत्रण सल्लागार रविंद्र ठानगे सचिन थोरात दिपाली जाधव किशोर म्हस्के यांनी झूम आप वरून ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले.                                        गाव कृती आराखडा माध्यमातून शाळा ,अंगणवाडीत असलेल्या नळजोडणी गावातील प्रमुख पिके तसेच येणाऱ्या काळात गावातील कुटुंबांना  लागणारे  पाणी गावची लोकसंख्या जनावरांची संख्या अशा वेगवेगळ्या घटकांचे नियोजन करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments