Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

साकत शिवारातील पेट्रोलपंपावर दरोडा ; अडीच लाखाचा मुद्देमाल चोरी

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- सोलापुर रोडवरील साकत शिवारातील केतन भारत पेट्रोलियम पेट्रोलपंपावर शनिवारी (३१) राञी २.३० वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकून चोरट्यांनी २ लाख  ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुक्यातील साकत शिवारातील केतन भारत पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना समजताच, घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व नगर तालुका सपोनि सानप यांनी भेट दिली.
 अज्ञात आरोपींना पेट्रोल पंपावर व कॅबिनमध्ये काऊटरमधील तसेच तेथील कर्मचारी यांना मारहाण करुन त्याच्या कडिल मोबाईल तसेच पेट्रोलपंपावर उभे असलेले ट्रक चालकाना मारहाण करुन त रोख रक्कम व मोबाईल पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी,मारहाण करुन जबरी चोरी दरोडा टाकुन त्यांना जबर मारहाण केली. या दरम्यान  रोख रक्कम व मोबाईल हँडसेट चोरुन नेला आहे.  या घटनेबाबत  अक्षय कुंडलिक गोल्हार ( पेट्रोलपंप मालक रा.कोहिनुर मंगल कार्यालयासमोर पाईप लाईनरोड अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून .गु.र.नं.व कलम 1 434/2021 भादवि कलम 395,397,आर्म.अँक्ट 3/25 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेंद्र सानप हे करीत आहेत


Post a Comment

0 Comments