Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सर्तकतेमुळे वाचले 50 लाख ; त्या बँक कर्मचा-याचा कर्जत पोलिसांकडून सत्कार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत- तालुक्यातील बारडगाव युनियन बँक ऑफ इंडीया या शाखेच्या कर्मचा-याच्या सर्तकपणामुळे 50 लाख सुदैवाने वाचले!, या घटनेमुळे कर्जत पोलिसांनी त्या बॅंक कर्मचा-याचा सत्कार केला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी, कर्जत तालुक्यातील बारडगाव युनियन बँक ऑफ इंडीया या शाखेतील विशेष सहाय्यक सुरज सुखदेव सोळसे ( वय २८) याने वाहनाने मंगळवारी (दि.१७)  सकाळी १०.३०वाजता कर्जत शाखेतून  ५० लाख रुपयांची रक्कम  विड्राल केली. ती कॅश गाडीत ठेवून गाडी चालू केली. परंतु या दरम्यान एक अनोळखी लहान मुलाने ऑईल गळत असल्याचे सांगितले. पण बॅंक कर्मचा-यास गाडीतून ऑइल येऊ शकत नसल्याबाबत विश्वास होता. यावेळी या सूचनेमध्ये आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असून, आपल्या मागावर चोरट्यांची नजर असल्याचे बॅंक कर्मचा-याच्या लक्षात आलं. त्याला या हलचालीचा संशय आला, क्षणाचा विलंब न लावात जवळील ५० लाख रुपये असणारी बॅग गाडीत ठेवून बॅंक कर्मचारी सुरज सोळसे  याने घटनेचे गांभीर्य ओळखून सदरची कॅश पुन्हा बँकेत जमा केली आहे.
बॅक कर्मचारी सुरज सोळसे यांच्या सतर्कतेमुळे बारडगाव युनियन बँक ऑफ इंडीया या शाखेचे ५० लाख रुपयाची लुटीपासून वाचले आहेत. बॅक कर्मचारी यांच्या अतिदक्षता व लक्ष विचलित न करता, कर्तव्याचे भान ठेवल्याने बॅक कर्मचारी सुरज सोळसे यांच्या सर्तक घटनेचे विशेष कौतुक होत आहेच, परंतु बॅंकींग क्षेत्रातील मान्यवरासह पोलिस प्रशासनाच्या वतीने त्या बॅंक कर्मचा-याचा  कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सत्कार केला आहे.
👉यावेळी पो. नि. चंद्रशेखर यादव यांनी कर्जतच्या जनतेला आव्हान केले आहे की, कोणी ऑईल गळत आहे, अथवा गाडीचे टायर पंक्चर झाले आहे,  इत्यादी कारणे सांगून पैसे चोरट्यांकडून लुटण्याच्या प्रकार होत आहे. यामुळे नागरिकांनी बॅंक अथवा अन्य ठिकाणी मोठी रक्कम घेऊन जाताना  सतर्कता बाळगावी.

Post a Comment

0 Comments