Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पतसंस्था मॅनेजरवर गोळीबार ; 5 लाख रुपये घेऊन चोरटे लंपास

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पारनेर - पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेच्या मॅनेजरवर गोळीबार करून  शाखेतून 5 लाख रुपये चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.7) सकाळी घडली. या घटनेत मॅनेजर बाळासाहेब रामचंद्र सोनवणे (रा. सोबलवाडी) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. 

 घटनेची माहिती मिळाताच, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी रवाने झाले असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले.

श्रीगोंदा, पारनेर तालुक्यासह विविध ठिकाणी पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे व्यवहार शनिवारी  सकाळी सुरू झाला होता. दुपारी दोनच्या सुमारास या ठिकाणी गाडीवरून एकजण आला. त्याने पतसंस्थेमध्ये प्रवेश करत पतसंस्थेमधून 5 लाख रुपये घेऊन पळून जात असताना शाखेच्या मॅनेजर यांनी आढवले, या दरम्यान,  त्या चोरट्याने जवळ असणारे रिव्हॉल्व्हरमधून मॅनेजरवर गोळी झाडली. यात मॅनेजर सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. 
या घटनेची माहिती समजताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी  वेगवेगळ्या मार्गांवर तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments