Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

302 मध्ये फरार असणा-या आरोपीसह पेट्रोल पंपावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडली ; एलसीबीची धडकेबाज कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- खूनच्या गंभीर गुन्ह्यात फरार असणारे आणि पेट्रोल पंपावर दरोडे घालणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडण्यात अहमदनगर  स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, यात कृष्णा विलास भोसले (वय २२, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, बीड),  सुरेश पुंजाराम काळे (वय ३८, रा. सोनवीर, ता. शेवगाव, जि. अ.नगर), रावसाहेब विलास भोसले (वय ४० रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड),  अजिनाथ विलास भोसले (वय २५, रा. हातवळण दाखले, ता. आष्टी, जि. बीड) या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडण्यात  आल्यांची माहिती पञकार परिषदेत अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके व त्यांच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोहेकाॅ सुनिल चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, पोना सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, रविंद्र घुंगासे, प्रकाश वाघ, रोहीत येमूल, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, विजय धनेधर, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे, बबन बेरड आदिंनी ही मोठी कामगिरी कली असल्याचे श्री अग्रवाल यांनी सांगितले.
कारवाई  दरम्यान चार आरोपींसह  ९ लाख ८० हजार  रु. किं. च्या तीन मोटार सायकली जप्त केल्या आहेत. या आरोपींविरुध्द यापूर्वीही मोक्का, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे श्री अग्रवाल यांनी म्हटले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके म्हणाले की, दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे  ३ वा. चे सुमारास नगर-सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर अज्ञात ७ ते ८ आरोपींनी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच तेथे उभे असलेले ट्रक चालक यांना मारहाण करुन व पिस्टलचा धाक दाखवून रक्कम चोरट्यांनी नेली होती.  दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजीचे पहाटे ३.१५ वा. चे सुमारास नगर-सोलापूर रोडवरील थेरगाव फाटा येथील फाळके पाटील अॅण्ड सन्स या भारत पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा घातला. या दोन्ही गंभीर  गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अतिशय कसून तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने या अट्टल गुन्हेगारांना पकडले आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी कमी करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
Post a Comment

0 Comments