Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

2 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद ; कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- गेली दोन वर्षापासून फरार असणारे आरोपीस पकडण्यास यश आले आहे. टिंग्या उर्फ गणेश म्हसूदेव पोटे (रा. सारसनगर ता. जि. अहमदनगर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहे.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी शिशिरकुमार देशमुख यांचे सूचनेनुसार पोसई सचिन रनशेवरे, पोसई बेंडकोळी पोहेकाँ दहीफळे, पोना भानूदास खेडकर, पोना राहुल द्वारके, पोकाॅ अविनाश कराळे, चापोकाँ अरुण मोरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 2 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या वादातून दि.3 सप्टेंबर 2019 रोजी कॅम्प पो स्टे गुर नं 647/2019 भादवि 143,147,324,323,504,506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी नामे टिंग्या उर्फ गणेश म्हसूदेव पोटे ( रा. सारसनगर ता. जि. अहमदनगर ) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदरचा आरोपी हा टु प्लस स्कीम मधील आहे.
दि.9 ऑगस्ट 2021 रोजी कॅम्प पो स्टे चे सपोनी शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, टिंग्या उर्फ गणेश म्हसूदेव पोटे  हा नगर पाथर्डी रोडने भिंगार येथे बेलेश्वर मंदीर येथे दर्शनासाठी येणार आहे. त्यानुसार 
सपोनी शिशिरकुमार देशमुख भिंगार कॅम्प पोलीस पथकाला सूचना दिल्या. पोलिसांनी बेलेश्वर मंदीरचे काटवनात सापळा लावला त्याला पकडण्यात आले.


Post a Comment

0 Comments