Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी शहारत वीज चोरी करणाऱ्या आठ जणांवर 1 लाखाचा दंड

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी :वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून धडक मोहीम हाती घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.वीज चोरी रोखण्यासाठी विज चोरी करणाऱ्यावर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, त्याच अनुषंगाने शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार सातशे तीन युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख तीन हजार ४४० रुपये दंड केल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली आहे. 
शहरातील वामनभाऊ नगर, म्हस्के कॉलनी, विजयनगर, नाथनगर या भागात धडकपणे कारवाई करून दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासाची मुदत महावितरणकार्यालयाकडून देण्यात आली आहे. संबंधित दंड न भरणाऱ्या ग्राहकांवर यापुढची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.यावेळी बोलतांना मयूर जाधव म्हणाले की,वाढती वीज चोरी थांबवण्यासाठी सध्या विशेष मोहीम आयोजित केली असून अचानकपणे हे पथक शहरातील विविध भागात वीज चोरी बाबत तपासणी करून कारवाई करणार आहे.वीज ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरावे ,वीज चोरून त्याचा वापर करू नये.येणाऱ्या काळात कोणत्या भागात किती वीज गळती होते त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन मोठी कारवाई हाती घेणार असल्याचं हि जाधव म्हणाले. 
या पथकात प्रमुख सहाय्यक अभियंता हितेश ठाकूर, सहाय्यक अभियंता मयूर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  आस्थापना विभागाचे प्रवीण घोरपडे, लेखा विभागाचे प्रमुख सहदेव शिरसाठ, दीपक मुसळे, गणेश वायखिंडे, लाईन स्टाफ अरुण दहिफळे, राजू म्हस्के, नवनाथ धायताडक, कृष्णा बर्डे, राजाराम जाधव, सुदर्शन शिरसाठ ,नितीन खेडकर, लक्ष्मण वाधवणे,प्रधान तंत्रज्ञ अभिषेक अन्नदाते, ऋषीकेश शिरसाठ, , भास्कर मरकड, देविदास शेळके आदी कारवाई दरम्यान सहभागी झाले होते. 


Post a Comment

0 Comments