Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

११ वीची CET २१ ऑगस्टला, ऑफलाईन परीक्षा


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल २८ मे,२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्‍चित करण्यात आला होता. या परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत करण्यात येणार आहे.
सीईटीची परीक्षा परीक्षा ही राज्य मंडळाअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील २०२१-२२ मधील ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती महाराष्ट्र बोर्डाच्या (मंडळाच्या) अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्‍नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) व OMR वर आधारीत असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments