Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीतील बांधकाम मजूर खून प्रकरण : उर्वरित फरार तीन आरोपी मालेगावात जेरबंद ; नगर एलसीबीची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शिर्डी येथे बांधकाम मजूराचा खून करून उर्वरित फरार असणा-या तीन आरोपींना मालेगाव येथून विविध ठिकाणाहून अटक करण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. 
मालेगाव येथे जावून तांत्रिक तपासाचे आधारे आरोपींचे वास्तव्याबाबत माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत आरोपी साहील गुलशन पठाण (वय १८, रा. पाथर्डी गाव, राजवाड नाशिक),  वारसी गॅसउद्दीन रजा शेख (वय १८, रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक), हासीम हारुन खान (वय २०, रा. बोरी कॉलनी, नालासोपारा, जि. ठाणे) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय १९, रा. पाथर्डीगाव, सुखदेवनगर, नाशिक), अविनाश प्रल्हाद सावंत ( वय १९, रा. पाथर्डीगाव, नाशिक), अमोल सालोमन लोढे (वय ३२, रा. कालिकानगर, शिर्डी), अरविंद महादेव सोनवणे ( वय १९, रा. श्रीरामनगर, शिर्डी) अशी पकडण्यात येऊन शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ रोहित येमूल, रणजित जाधव, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, चापोहेकॉ बबन बेरड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत माहिती अशी की, दि. २९ जून २०२१ रोजी सायंकाळी मामाचा मुलगा राजेन्द्र आंतवन धिवर (रा. राजगुरुनगर, शिर्डी) असे दोघे राहाता येथील मजूरीचे काम संपवून सायकलवरुन घरी जात असताना सायंकाळी ७.३० वा. चे सुमारास सायकल चालवून थकल्यामूळे राहाता-शिर्डी रोडवरील निसर्ग हॉटेल जवळ मोकळ्या जागेत बसले. यावेळी  दोन मोटार सायकलवरुन चार अनोळखी मुले त्यांचेजवळ आले. मोटारसायकली रस्त्याचे कडेला उभ्या करुन फिया व राजेद्र धिवर यांचेकडे येवून माचीस मागीतली. त्यावेळी राजेद्र धिवर याने त्याचे जवळील पिशवीमधून माचीस काढून सायकलचे सिटवर ठेवून सदर अनोळखी मुलांना घेण्यास सांगितले. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी त्यांच हातातील कोणत्यातरी धारदार हत्याराने राजेद्र आंतवन धिवर याचे डोक्यावर, पोटावर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सदर आरोपीने  " याला देखील पकडा व मारा" असे म्हणाल्याने फिर्यादी तेथून पळून गेले. सदर चार अनोळखी इसम हे राजेद्र धिवर याचा खून करून मोटार सायकलवरुन पळून गेले.  संजय मधूकर पवार ( सेन्ट्रींग मजुरी, रा. राजगुरुनगर, शिर्डी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून घटनेबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात  गुरनं. २३७ / २०२१ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments