Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कॉबींग आँपरेशन दरम्यान फरार आरोपीस अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर-  कॉबींग आँपरेशन दरम्यान   पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांची राञीगस्त सुरु असताना संशयीतरित्या सुर्यास्तानंतर तिघा फिरणा-यावर गुन्हे दाखल केले असून, यात यापूर्वी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असणारा आरोपी सुमीत बाळासाहेब थोरात याला अटक करण्याची कारवाई केली. आरोपी थोरात याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे. 
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पपोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार कोंबींग ऑपरेशनमध्ये  पोसई एम के बेंडकोळी. पोहेकॉ जे एन आव्हाड, पोहेकाँ जी जी गोडे,  पोना बी जी खेडकर, पोना आर. आर. द्वारके, पोकाँ सोनवणे, पोका लगड,  चापोकाँ काळे, पोकाँ घोलप आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यांना आळा घालण्याकरीता वरिष्ठांचे आदेशान्वये कॉबींग आँपरेशन राबविण्यात आले होते. या दरम्यान  कॅम्प पोलीस रात्र गस्त दरम्यान कोंबीग ऑपरेशन राबवीत असताना रात्री 2 .50षवा. चौक, नागरदेवळे रोड येथे दोन इसम मोपेड गाडीवर तसेच गोविंदपुरानाका, मुकुंदनगर रोड येथे तीन इसम मोपेडगाडी वर रात्री 3.10 वा. सुमारास स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पदरित्या फिरताना मिळून आले. त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली.  त्यांना अधिक विचारपूस करता त्यांनी त्यांची अनिल भानुदास जाधव (वय 26 रा. प्रेमदार हाडके, नोबेल हॉस्पीटल मागे, अहमदनगर),  विकी बाळासाहेब वाव्हळ (वय 28 रा. पारीजात अपार्टमेंट, मेघराज कॉलनी, सहकार नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले.  त्यांचेविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  गुर नं 290/2021 भादविक 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच संगोविंदपुरा नाका येथे मिळून आलेल्या इसमांनी त्यांची सुमीत बाळासाहेब थोरात (वय 19 ), स्वप्निल रमाकांत पाटील (वय 19), अनिश बाळू पवार (वय 21 सर्व रा. गजानन कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितल्याने त्यांचेवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं 292/2021 मुं पो क 122 प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत आरोपी सुमीत बाळासाहेब थोरात (वय19,  रा. गजानन कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर) याचेवर यापूर्वी याप्रमाणे गुन्हे आहेत, ते असे एम.आय.डी.सी.पो.स्टे. गुर नं 20 / 2019 भादवि कलम 324,323. एम.आय.डी.सी.पो.स्टे. गु र नं 378/2021 भा द वि कलम 307,326,324, 143, 147 वगैरे ( फरार). आरोपी थोरात  हा गुन्हा घडले दिनांकापासून फरार असल्याचे समजले तसेच सदर आरोपीस मा.न्यायालयात समक्ष हजर करून त्यास एमआयडीसी.पोलीस ठाण्यात  गुरनं 378/2021 भादवि कलम 307 च्या तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
गुन्ह्यांचा पुढील तपास पोना गणेश साठे, पोना भानुदास खेडकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments