Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर पोलिस दलात ई-टपाल कार्यप्रणालीमुळे मनुष्यबळ कमी लागून पोलिसिंगला मदत होणार : जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील

 


👉अहमदनगर पोलीस दलामध्ये ई-टपाल कार्यप्रणाली यशस्वी होत आहे.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हा पोलीस दलामध्ये दि १० फेब्रुवारी २०२१ रोजी पासून ई-टपाल ही संगणकीय कार्यप्रणाली सुरु करण्यात आली. या कार्यप्रणालीमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये केले जाणारे टपालेचे देवाण-घेवाण ऑनलाईन पध्दतीव्दारे जलद गतीने झालेले आहे.यात ९० टक्के कामकाज झाले आहे. यामुळेच टपालसेवेसाठी मनुष्यबळ कमी लागून पोलिसिंगला मदत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पञकारांशी बोलताना दिली.
श्री पाटील पुढे म्हणाले की, सदर ई-टपाल कार्यप्रणालीचा वापर करून आपणास नवीन आलेली प्रलंबित प्रक्रियेत असलेली व कार्यवाही पूर्ण झालेले टपाल यावर नियंत्रण ठेवता येते. तसेच सदर ई-टपाल प्रणालीमुळे नागरिकांनी केलेल्या अर्जावर विहित मुदतीत तात्काळ सेवा देता येत असल्याने पोलीस प्रशासनातील कामकाज अधिक पारदर्शक व कार्यक्षम झाले आहे.
सदर ई-टपाल प्रणाली मध्ये जिल्ह्यातील सर्व शाखा व पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना युजर आयडी दिला असून त्यांना टपाल प्राप्त झाल्यास त्यांचे कडून त्या टपालावर कार्यवाही केली जाते. ज्या टपालावर अद्याप कार्यवाही केली नाही असे टपाल प्रलंबित दिसतात. डॅशबोर्ड वर कोणत्या पोलीस ठाणे/ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शाखा यांच्याकडे टपाल प्रलंबित आहेत व किती दिवसांपासून प्रलंबित आहे याबाबतचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवलोकन करता येते असल्याने पोलीस प्रशासनात अधिक कार्यक्षमता निर्माण झाली आहे.
👉ई- टपाल कार्यप्रणाली मुळे होणारे फायदे होतात. - यात अधिकारी व कर्मचारी यांना होणारे फायदे - सर्व टपाल सॉफट कोपीमध्ये असल्याने ते गहाळ होत नाही. सर्व टपाल ऑनलाईन आवक जावक करता येत असल्याने मनुष्यबळ व वेळेची बचत होते.  ई-टपाल प्रणालीमुळे कामकाज सुटसुटीत झाल्याने ताण कमी होण्यास मदत होते.ई-टपाल मधील ट्रॅकिंग सिस्टममुळे टपालच्या कोणत्या टप्प्यावर प्रलंबित आहे हे समजून येते.टपालाची सद्यस्थिति दिसून येत असल्याने दप्तर दिरंगाई टाळता येते.
👉 वरिष्ठ अधिकाऱ्यांना होणारे फायदे -  ई-टपाल कार्यप्रणाली मुळे वरिष्ठ अधिकारी यांना टपालाचा दैनदिन आढावा घेऊन कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करता येते असल्याने प्रशासनात अधिक कार्यक्षमता निर्माण होते. ई-टपाल कार्यप्रणाली कोणाकडे किती कामाला Work Lead) आहे हे वरिष्ठ अधिकारी यांना दिसून येत असल्याने कोण किती प्रामाणिकपणे काम करतो तसेच कोण कामचुकार पणा यात फरक करता येतो. ई-टपाल कार्यप्रणालीने वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे नागरिकाचे प्रकरणे जलदगतीने तसेच पारदर्शकपणे निकाली निघाल्याने नागरिकांना येणार कटूप्रसंग कमी होतील.
👉 शासनाला होणारे फायदे - ई- टपाल कार्यप्रणालीमुळे शासनाचे कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम होऊन नागरिकांच्या मनात प्रशासनाप्रती विश्वास व सौजन्याची भावना निर्माण होईल. ई - टपाल कार्यप्रणाली टपालाची देवाण घेवाण ऑनलाईन असल्यामुळे कागद, प्रवास व मनुष्यबळ यावर होणारा शासकीय खर्चाची बचत होते.
👉 नागरिकांना होणारे फायदे - ई-टपाल कार्यप्रणाली मुळे महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ नुसार नागरिकांनी केलेल्या अर्जावर ठरवून दिलेल्या मुदतील कार्यवाही त्यांच्या अर्जावर निर्गती करणे शक्य होते. ई-टपाल प्रणालीमुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाबाबत तात्काळ सेवा देता येत असल्यामुळे त्यांचे मनात प्रशासनाप्रती
सद्भावना निर्माण होते. ई-टपाल प्रणालीमुळे नागरिकांना त्यांचा अर्ज गहाळ झाला अथवा मिळाला नाही. या कारणामुळे त्यांची टाळाटाळ होवून मनस्ताप होत नाही. ई-टपाल प्रणाली ऑनलाईन असल्याने नागरिकांचा प्रवास तसेच प्रवासाच्या खर्चाची बचत होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी सांगितले.

👉अहमदनगर जिल्ह्यातून जनतेची दि.१ जानेवारी ते दि.२३ जुलै या दरम्यान पासपोर्ट अर्ज, सशुल्क बंदोबस्त, चारित्र्य पडताळणी, पेट्रोल पंप, सुरक्षा रक्षक एजन्सी, शस्त्र, स्फोटक परवाना, वाईन शाॅप, परमिट रुम, इतर परवाने असे एकूण १७ हजार ८३४  अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी विहित मुदती फक्त ७ अर्ज प्रलंबित असून उर्वरित निकाली निघाले असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले.


Post a Comment

0 Comments