Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारू वाहतूक करणा-या गाड्या लुटणा-या टोळीतील फरार आरोपी अटक ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : दारुची वाहतूक करणा-या वाहनातील माल लुटून त्याची विल्हेवाट लावणा-या टोळीतील फरार आरोपी अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संतोष खरात असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ रविन्द्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमूल, विजय धनेधर, प्रकाश वाघ, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
थोडक्यात हकीगत अशी की,शंकरराव काळे साखर कारखाना कोपरगाव येथून, ७ लाख २८ हजारांची देशी दारु, एम एच ४१ जी ६३९१ या ट्रक मध्ये भरुन विष्णुपूरी (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे पोहोच करण्यासाठी जात असताना. २५ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री १० वाजेच्या सुमारास, झगडे फाटा येथे आले असता, आरोपी संतोष गौतम खरात, योगेश कैलास खरात, धंनजय प्रकाश काळे (सर्व रा. भोजडे चौकी, कोपरगाव) व एका अनोळखी इसमाने, ट्रकचालक शरद गोपीनाथ वरगूडे (वय ४०) यास मारहाण केली. त्याच्या ताब्यातील ट्रक दारुसह बळजबरीने चोरुन नेला होता. या बाबत दिलेल्या फिर्यादीवरून, कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९४, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष गौतम खरात हा फरार झालेला होता

Post a Comment

0 Comments