Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डिझेल चोरी करणारे दोन आरोपी अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - काॅबिंग ऑपरेशन दरम्यान डिझेल चोरी करणा-या  दोन आरोपी अटक करून स्कॉर्पिओ व डिझेल चोरीचे सामानसह मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई  भिंगार कॅम्प पोलिसांनी केली.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार  सफौ शेख मैनुद्दीन, पोहेकाॅ गोपीनाथ गोडे, पोना राहुल द्वारके, पोना भानूदास खेडकर, पोना गणेश साठे, पोकॉ एस बी सोनवणे, चापोकाॅ संजय काळे, पोकाॅ शेख मुस्तफा आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.26 जुलै 2021 रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यांना आळा घालण्याकरीता  वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने ऑपरेशनसह पेट्रोलींग राबविण्यात आले. या काॅबिंग ऑपरेशनमध्ये पहाटे 4 वा. सुमारास छावणी कॉम्लेक्स पाठीमागे, स्टेटबँक चौक, अहमदनगर येथे एक स्कॉर्पिओ गाड़ी संशयास्पदरित्या उभी असताना दिसली. तेव्हा गाडीची तपासणी करून त्यामधील संशयीतरित्या बसलेल्या इसमांना नाव, गाव विचारले असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे न दिल्याने त्यांचेसह गाडीची झडती घेतली.  झडतीमध्ये डीजेल ड्रम पाईप, कटर, पाने, पक्कड असे डिझेल चोरीचे सामान मिळून आले. राजु बाबुराव जवळकर (वय 55 रा. खडकवासला, सिंहगड रोड, पुणे) नितीन शामराव समुद्रं (वय 35  रा. वाकडगाव म्हसोबा नगर जि. पुणे) असे नावे सांगितले. सदर इसमांची विरुद्ध काही गुन्हे आहेत का? याबाबत तपासणी  केली असता, यातील आरोपी  राजु बाबुराव जवळकर याचे विरुद्ध
 खालीलप्रमाणे गुन्हे  👉 खडक,  कोतवाली, कोंढवा, संगमनेर, कराड शहर, येरवडा,  वारजे, नारायणगाव,  स्वारगेट, डेक्कन,  कोथरूड, निगडी, खडक पोलिस ठाण्यात  गुन्हे दाखल असून तो सराईत टोळीचा सदस्य आहे.
 सदर ठिकाणी देखील तो उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करण्याच्या तयारीत असताना त्यास व त्याच्या साथीदारास रंगेहात पकडण्यात आले. त्याचे ताब्यातून स्कॉर्पिओ (एमएच 16 एजी 4044), दोन मोबाईल असा असलेला व डिझेल चोरीचे साहीत्य साधनासह ताब्यात घेण्यात आले. त्यांचेवर भिंगार कॅम्पचे पोकाॅ एस बी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 
गुर नं 293/2021 भादवि कलम 379,511 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दरम्यान,   5 लाख रू किं चे स्कॉर्पिओ गाडीसह जप्त केला आहे. तसेच कॅम्प पोलीस ठाण्यात डीझेल चोरीचे गुन्हे अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल असल्यास सदर आरोपीतांची चौकशीकामी गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments