Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खोटे गुन्हे दाखल करून... ; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकल्यास मारून टाकीन व खोटे गुन्हे दाखल करून करिअर संपून टाकीन, अशी धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, शुक्रवार  दि.9 जुलैला घरासमोर उभा असताना दोन अनोळखी जणांनी येऊन म्हणाले, एपीआय विवेक पवार यांच्या विरोधात पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकू नको नाहीतर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून करिअर संपून टाकीन अशी धमकी दिल्याप्रकरणी निलेश कन्हैयालाल बांगरे (रा.रविश काॅलनी, कायनेटिकचौक, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोना धोञे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments