Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा राइड हँड अटकेत ; खंडणी विरोधी पथकाची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राइड हँड गँगस्टर युसूफ बचकाना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. खंडणीसह हत्येच्या प्रकरणात युसूफ बचकानाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला कोर्टात हजर करून २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहितीनुसार, अनेक वर्षांपासून युसूफ बचकाना फरार होता. त्याच्यावर हत्येसहित खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बेल्लोरी इथल्या तुरुंगातून युसूफचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने घेतला आहे. त्याला आज किला कोर्टात हजर करण्यात आले आणि कोठडी मागणी करण्यात आली. त्यामुळे युसूफ बचकानाला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच खंडणीच्या गुन्ह्यात त्याचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेण्यात आला आहे.
आरोपी युसूफ बचकानाचे खरे नाव युसूफ सुलेमान कदरी असे आहे. बिल्डर सुब्बा राव यांच्या हत्येनंतर २००७ पासून युसूफ बचकाना जन्मठेपीची शिक्षा भोगत आहे. गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीबरोबर युसूफने काम केले आहे.


Post a Comment

0 Comments