Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टायर फसवणुकीतील 'मास्टर माईंड' ला हिंगोलीतून अटक ; कर्जत पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत -  येथील टायर दुकानदारांना टायरचा डीलर असल्याचे सांगून फसवणूक करणा-या मास्टर माईंटला हिंगोलीत अटक करण्याची कारवाई कर्जत पोलिसांनी केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,कर्जत येथील  टायर दुकानदारांना टायरचा डीलर असल्याचे सांगून त्यांचे कडून टायरची ऑर्डर करीता पैसे अकाउंटला मागून  घेत असे. त्यांना टायर न देता मिळालेले पैसे फसवणूक करून स्वतः कडे ठेवत असे. कर्जत मधील टायर दुकानदारास 6 लाख 83 हजार  रू ची फसवणूक केली. त्या संदर्भात जानेवारी महिन्यात कर्जत पोलीस स्टेशन गु र न 19/2021 भादवी कलम 420,406 प्रमाणे फिर्याद दाखल झाली. त्यानुसार पोलसांनी तपास सुरु केला.  परंतु आरोपी गणेश कांताराव पिंगळकर हा पुणे तसेच मुबई फिरून  पोलिसांना चकवा  देत होता. कर्जत  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव याचे सूचना व मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध चालूच होता. आरोपी हा त्याचे मूळ गावी हिंगोली जिल्हा तेथे असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळली. श्री यादव यांनी तात्काळ पोलीस पथकास पाठवून आरोपी गणेश कांतरव पिंगळकर (वय 31) याला ताब्यात घेतले.  यावेळी पिंगळकर याला पोलिसांनी पोलीस खाक्या दाखविताच त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. सदर गुन्ह्यात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुरेश माने करत आहेत.
 यापूर्वी अटक आरोपीवर फसवणुकीचे 6 गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून फसवणुकीची 4 00,000 रु रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments