Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपरिवर्तन झाले ; दारूविक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरू केले ! ; पो. नि. चंद्रशेखर यादवांची अशीही किमया

  

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :    'दारू म्हटलं की डोळ्यासमोर येते ती संसाराची झालेली राखरांगोळी...घरात अठरा विश्वाचे दारिद्र्य...मुलाबाळांच्या शिक्षणाची हेळसांड...दारू पिणाऱ्यावर समाज भडकतोच पण दारूविक्रेत्यावर याचे पडसाद उमटतात!पण दारूविक्रीचा व्यवसाय सोडून एखाद्याने चक्क चहा विक्रीचाच व्यवसाय सुरू केला तर कुणाला नवल वाटायला नको! पण हा बदल करून दाखवला आहे कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या अभिनव संकल्पना आणि उपक्रमांनी जिल्हाभर कायम चर्चेत असलेल्या यादव यांच्या या किमयेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.कर्जत येथे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे कारवाया करत असताना ते अनेकांची मने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.'अवैध व्यवसायामुळे समाजात आपली प्रतिमा मालिन होते, मान-सन्मान मिळत नाही त्यामुळे सन्मानजनक व्यवसाय करून आपण जबाबदार नागरिक आहोत अशी ओळख निर्माण करून द्यावी' असे प्रत्येकवेळी अवैध व्यावसायिकांना ते मार्गदर्शन करतात.प्रसंगी त्यांनी अनेकांवर मोठ्या कारवायाही केल्या.पण त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ कधीही लपून राहिली नाही.कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारूविक्री करत होते.त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी वारंवार कारवाया करण्यात आल्या होत्या.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावून 'तुम्ही अवैध धंदे करू नका' अशी वेळोवेळी समज दिली. चांगला व सन्मानजनक व्यवसाय करा मी आवशक्यतेप्रमाणे तुम्हाला मदत करेल असे वेळोवेळी त्यांना सांगून जबाबदार नागरिकाची भावना पटवून दिली. अन्  चंद्रशेखर यादव यांची ही तळमळ दारूविक्री व्यवसाय करणारे बाळासाहेब माने यांचे मनपरिवर्तन करणारी ठरली.त्यांनी भांडेवाडी येथे करमाळा रस्त्यालगत श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल सुरू केले. यादव एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी हॉटेलवर जाऊन हॉटेलवर बनवलेल्या चहाची चव चाखत नवीन व्यवसायकरिता शुभेच्छाही दिल्या.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने,पत्रकार आशिष बोरा,गणेश जेवरे हे उपस्थित होते.

👉साहेब,आता अवैध धंदा 
करणार नाही हा माझा शब्द!
  'साहेब,आता पुढील काळात कसलाही अवैध व्यवसाय करणार नाही.असा मी आपणाला शब्द देतो'.दारूविक्रीचा व्यवसाय सोडून चक्क चहा विकणाऱ्या या नवख्या व्यावसायिकाच्या या शब्दाने चंद्रशेखर यादवही भारावले.बाळासाहेब माने यांनी घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणा तर आहेच पण 'जबाबदार नागरिक बना,चांगले जीवन जगा' यादव यांचा हा संदेश अनेकांचे परिवर्तन करणारा आहे.

Post a Comment

0 Comments