Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोघांना दमदाटी देत जबर मारहाण ; तोफखान्यात गुन्हा दाखल

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- येथील राज चेंबर कोठला या ठिकाणी दुकान विकत नसल्याच्या कारणातून दोघांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी (दि.28) सायंकाळी 7.45  वाजण्याच्या सुमारास घडली. यात एकजण जखमी असून,याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, राज चेंबर कोठला अहमदनगर येथे सरकार पान टपरीजवळ चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो असता तोच तेथे आरोपी हा हातात लोंखडी राॅड घेऊन व त्याच्या सोबत 7 ते 8 अनोळखी जण हातात लोंखडी राॅड घेऊन जवळ आले. म्हणाले शानु बागवान  याचे दुकान जमशेद शबीर शेख, समिर शबीर शेख यांना विकण्यास तयार नाही. या कारणातून शानु बागवान म्हणाला की, दुकान बेचेनेके बारे में तुझे इतने दिनसे समझाके बोल रहे है.  तू सुनताही नहीं, आज तुझे दुकानके लिये जान गबानी पडेंगी बोल क्या करता तू तेरी दुकान जमशेद शबीर शेख, समीर शबीर शेख इनको देता या नही, असे म्हणाला. त्याच्या सोबत असणा-यांनी डोक्यात सपासप मारहाण करून लोंखडी राॅडने मारहाण केली. यात दोन तोळ्याची चैन गहाळ झाली असून, मिञ प्रकाश देहरेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, अशी  अंजिम नजिर तांबटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शानु बागवान (पूर्ण नाव माहिती नाही मुकुंदनगर, अहमदनगर), त्याचे 7 ते 8 अनोळखीविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं ६३८ / २०२१ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि समाधान सोळंके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments