Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिवसा घरफोडी करणारे सख्खे भाऊ अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर  -  दिवसा घरफोडी करणा-या सख्खा भावांना पकडण्याची भिंगार कॅम्प पोलिसांनी कामगिरी केली आहे. राजु एकनाथ पिटेकर, भाऊ सतिष एकनाथ पिटेकर (दोघे रा. मिरी माका ता. नेवासा जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोसई एमे के बैंडकोळी, पोहेकाँ ए एन नगरे, पोना आर. आर. द्वारके,  पोना बी जी खेडकर, पोना व्ही सी गंगावणे, पोकाँ बी एम लगड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कापुरवाडी (ता. जि. अहमदनगर) येथे दि. 7 जुलै 2021 रोजी गणेश मगर यांचे राहते घरातून दोन अज्ञात व्यक्तींनी दिवसा घरफोडी करून घरातून 24 हजार  रोख रक्कम व 28 हजार  रू कि चे सोन्याचे दागीने चोरून नेल्याबाबत भिंगारकॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  होता. हा दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना, सपोनी श्री  देशमुख यांना  माहीती मिळाली, कापुरवाडी दाखल गुन्ह्यातील आरोपी हे अहमदनगर शहरात स्टेटबँक चौक येथे फरत आहे. त्यानुसार   सपोनी देशमुख यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. पथकाने तात्काळ सापळा रचून दोनजणांना  ताब्यात घेतले.  त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी राजु एकनाथ पिटेकर व त्याचा भाऊ सतिष एकनाथ पिटेकर (दोघे रा. मिरी माका ता. नेवासा जि. अहमदनगर ) असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात रोख रक्कम 10 हजार  मिळून आले. सदर गुनह्याचे अनुषंगाने विचारपुस करता प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली. त्यांनंतर त्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना अधिक विश्वासात घेऊन गुनह्यातील पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून चौकशी केली. या दरम्यान त्यांनी कापुरवाडी येथील गणेश मगर यांचे घरात दिवसा चोरी केल्याचे कबुल दिली.
दोघे आरोपी हे गणेश मगर यांच्या घरी चालक म्हणून 15 दिवस काम करून चोरी करून फरार झाले होते. सदर गुन्ह्यामध्ये तपासामध्ये आरोपीतांकडून रोख रक्कम 11 हजार व गेला माल सोन्याचे दागीने मधील एक सोन्याचा ओम, एक सटवाई, व गंठण मधील 37 सोन्याचे मनी असे 14 हजार  रू किं चे सोन्याचे दागीने असा एकून 25 हजार  रु किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments