Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याचा धुमाकूळ !

 

वनविभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळी केली पाहणी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी-  तालुक्यातील चिंचपुर पांगुळ- वडगांव येथे मागील आठ  दिवसांपासून वाघेश्वर परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. 


येथील शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांची शिकार केली आहे. सोमवारी (ता.१९) जि. प. प्रा .शाळा वाघेश्वरवस्ती येथे सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिबट्यासदृष्य वन्यप्राण्याने एका कुत्र्याची शिकार केली आहे.

ही घटना रेखा पांगरे व त्याचे पती अशोक पांगरे यांनी पहिली कुत्रा विचित्र पद्धतीने ओरडत असल्याने त्यानी बाहेर येऊन पहिले असता, बिबट्या सदृश्य प्राणी त्यानां शाळेच्या बाजूला असलेल्या लक्ष्मण सांगळे यांच्या शेतातील उसात फरफटत घेऊन जातांना पहिला.  वडगांव, ढाकणवाडी परिसरात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने अलीकडील काळात जगली प्राण्याचा वावर वाढला आहे. 
यामुळे तालुक्यातील पूर्वभागातील शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच  वनविभागाचे कर्मचारी श्री शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून वन्य प्राण्याच्या पायांचे ठसे घेतले आहेत. 
यावेळी श्री शेळके यांनी बोलताना सांगितले की, आम्ही सदर ठश्याचे फोटो तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतर गरज पडल्यास पिंजरा लावण्यात येईल.

 संकलन- पत्रकार सोमराज बडे

Post a Comment

0 Comments