Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हमाली कामाचे हुक देण्याच्या कारणातून खूनाचा प्रयत्न : चौघांवर कोतवालीत गुन्हा दाखल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- हमाली कामाचे हुक देण्याच्या कारणातून नगर दौंड रस्त्यावर कायनेटिक कंपनीजवळ हाॅटेल अंबिकासमोर खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चारजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा हजारे (रा.चिचोंडी पाटील ता.नगर),   मनोज वाघचौरे, इजराज, ठोसर (पूर्ण नाव माहिती नाही) आदिंच्या वर ५१८/२१ भादविक ३०७,३२६,३४१,१४३,१४७,१४८.१४९,३२३,५०४, ५०६,४२७  प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.१७ जुलैला नगर दौंड रस्त्यावर कायनेटिक कंपनीजवळ हाॅटेल अंबिकासमोर बाबा हजारे याच्याबरोबर  दि १२जुलैला हमाली कामाचे हुक देण्याचे कारणावरून वाद झाले. यावेळी हजारे याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर त्याने गैरकायदयाची मंडळी जमवून एकत्रित चार मोटारसायकलवरुन येऊन दि.१२जुलै रोजी झालेल्या भांडणाचे कारणावरुन हजारे  याने त्या दिवशी तू मला हुक मागीतला होता ना, आता तुलाच तुला मारुन टाकतो, असे म्हणून त्याचे हातातील लोखंडी पाईपने जिवे ठार मारण्याच्या उददेशाने डोक्यात आणि बरगडीवर मारहाण करून जबर दुखापत करुन बरगडी फॅक्चर केली. तसेच खाली पाडून मनोज वाघचौरे व इजरात यांनी अंगावर चढून छातीत लाथा मारून उर्वरित आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून दमदाटी करून येथून गेले, या नवनाथ नारायण वाघ (रा.मांडवगण, ता.श्रीगोंदा) यांनीदिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे पोसई महाजन हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments