Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राख प्रदुषणाविरोधात कन्हेरवाडी ग्रामस्थांचा दोन तास रास्तारोको

 
 
राख वाहतुक बंद झाली नाही तर राख प्रशासनाच्या दारात आणून टाकू- माणिकभाऊ फड 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी - औष्णिक विद्युत केंद्र परळी येथून अवैद्य राख दाऊतपुर शिवारातून हजारो टन अवैध राख अवैधरित्या वाहतूक केली जाते याकडे आरटीओ ,पोलीस प्रशासन व तहसिल  प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे परळी परिसर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.या अवैध राख वाहतुकीविरोधात परळी-अंबाजोगाई मार्गावर कन्हेरवाडी ग्रामस्थांनी दोन तास रास्तारोको केला. या आंदोलनाला गावकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला 

आठ दिवसात  अवैध राख वाहतूक करणारी वाहने बंद केले नाही तर  समस्त गावकऱ्यांच्या वतीने वाहने अडवून वाहनांचे नुकसान केले जाईल असावा इशारा माणिकभाऊ फड यांनी दिला.
  परळीतून दरारोज हजारो टिप्परने अवैध राख  वाहतूक केली जाते  वाहतुकीसंदर्भात माणिक भाऊ फड  व समस्त कन्हेरवाडी गावकरी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊनही कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे नाईलाजास्तव समस्त गावकरी मंडळ यांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतरही  प्रशासनाला जाग आलेली नाही दिनांक 6/7/2021  रोजी सकाळी 9 वाजेपासून  राष्ट्रवादीचे युवक नेते माणिक भाऊ फड व समस्त गावकरी मंडळ एकता संघर्ष समिती यांनी रास्ता रोको करतेवेळी यावेळी माणिक भाऊ फड , भास्कर नाना रोडे (रिपाई राज्य सचिव )यांनी सदर आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी नगरसेवक प्रा.पवन मुंडे, माऊली दादा फड ,सुरेश ( नाना )फड, निवृत्ती आप्पा फड ,समाधान मुंडे, विशाल रोडे ( ग्रा.प सदस्य ), कैलास फड. अंबादास रोडे ,महादेव आप्पा रोडे, सदरील कन्हेरवाडी येथे आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी परळीचे नायब तहसीलदार बी एल रुपनर ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि मुंडे ,तलाठी विष्णू गीते व इतर कर्मचारी हजर होते.यावेळी परळी व अंबाजोगाई या दोन्ही बाजुने दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांना ग्रामस्थांच्या वतिने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments