Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोतवालीचे पो.नि राकेश मानगांवकर यांना कारणे दाखवा नोटीस

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कोतवाली पोलिस ठाण्याचे  पो.नि. राकेश मानगांवकर यांना अहमदनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.सी देशपांडे यांनी कारणे दाखवा नोटीस काढली आहे.
याबाबतची माहिती अशी की, हनुमाननगर, नगर-दौंड रोड, केडगाव अहमदनगर येथील सौ निर्मला अनिल येणारे यांना अहमदनगर येथील सुरज बलभिम शेळके यांने महानगरपालिकेचे वतीने नळ कनेक्शनचे ठेकेदारीचे काम करत असताना आजूबाजूचे लगतचे लोकांचे तुटलेले नळ कनेक्शन जोडले मात्र निर्मला अनिल येणारे राहत असलेल्या घराचे नळ कनेक्शन ठेकेदार सुरज शेळके याने जोडून दिले नाही. म्हणून निर्मला येणारे यांनी महापलिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याने आरोपीने फिर्यादीचे नळ कनेक्शन जोडुन दिले मात्र त्यावेळी आरोपीने "तुम्ही येथे कसे राहाता? माझे कुणी काही वाकडे करु शकत नाही. तुमचे पती फौजी आलेनंतर त्याचेकडेही बघुन घेऊ" अशी धमकी दिल्याने दि. २९ नोव्हेंबर २०२० रोजी फिर्यादी निर्मला येणारे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार केली व पुढे त्या अनुषंगाने आरोपीने दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४ ते ५ वाजण्याचे दरम्यान आरोपीने फिर्यादीचे घरासमोरील सिमेंट क्रॉकटिचा रॅम्प अनाधिकाराने काढून तेथील तेथील संपूर्ण माती काढून मोठा खड्डा करून पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दिली. परंतु पोलिसांनी जुजबी कलम लावून फिर्यादीची बोळवण केली, म्हणून निर्मला येणारे यांनी ॲड सुरेश लगड यांचेमार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे दाद मागितली असता, न्यायालयाने कोतवाली पोलिसांना क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम २०२ अन्वये तपास करुन एका महिन्यात अहवाल न्यायालयात हजर करणेस सांगितले होते. सदरचा आदेश होऊन ४ ते ५ महिने झाले तरीही कोतवाली पोलिसांनी सदर गुन्हयाचा अहवाल न्यायालयात दाखल केला नाही.  न्यायालयाचे आदेशाचे पालन केले नाही, म्हणून न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. राकेश मानगावकर यांनी तपासाचा अहवाल का दाखल केला नाही? या संदर्भात फिर्यादीने कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  यांचे विरुद्ध कारणे दाखवा नोटीस काढावी अशी विनंती केली होती. न्यायालयाने अहवाल दाखल करणेकामी कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रमुख राकेश मानगांवकर यांना स्मरणपत्र व कारणे दाखवा नोटीस काढून दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश केला आहे. कर्तव्यात कसूर केल्यास व न्यायालयाचे आदेशाचे पालन न केल्यास काय होते. या निमित्ताने कळाले. या प्रकरणात फिर्यादी निर्मला येणारे यांचेवतीने ॲड  सुरेश लगड काम पाहत आहे. 

Post a Comment

0 Comments