Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सैन्यदलात भरतीपूर्व खोटी माहिती दिली ; युवकावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -  सैन्यदलात भरतीपूर्व गुन्हे दाखल असताना प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देऊन सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी आकाश ऋषिपाल तेवतिया या युवकाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आकाश ऋषिपाल तेवतिया (रा. छोलसकिमैडया ता.दादरी, जि.गौतमबुध्दनगर) याने व्हि.आर.ओ मेरट (युपी) येथे  भरती होताना माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाहीत,  असे म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले होते. खोटे लेखीपत्र देऊन सैन्यदलाची फसवणूक केली, ही बाब सैन्यदल अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता,  आकाश तेवविया याच्यावर पोलीस ठाणे (जि. गौतमबुद्धनगर) येथे 425 /2017 भादवि कलम 147,148,149,307,352,232 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. ही बाब पडताळणी दरम्यान उघड झाली. याबाबत सैन्यदलाचे पुरणचंद डि.एम.आर रेजिमेंट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोना गायकवाड हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments