Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाळकी मंडळ अधिका-यावर हल्ला ; दोघांवर भिंगार कॅम्प ठाण्यात गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

अहमदनगर :  विनापरवाना व बेकायदा डबरची चोरी करणा-यांकडून वाळकी मंडळ अधिका-यास खाली ओढवून शिवीगाळ दमदाटी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, विनापरवाना व बेकायदा डबरची चोरी करीत असता पकडले असता विचारले. यावेळी वाळकी मंडळ अधिकारी यांना खाली ओढवून शिवीगाळ,दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा केला, वाळकी मंडळ अधिकारी भागीनाथ जगन्नाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाल जाधव, विशाल वारूळे (दोघे रा.वारूळवाडी ता.नगर) या दोघांविरूद्ध भादंवि क ३५३,३३२,५०४,५०६,३४ सह गौण खनिज कलमान्वेय भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments